Home > Politics > नवाब मलिक यांचे ट्विट चर्चेत, रविवारी मलिक कोणता बॉम्ब फोडणार?

नवाब मलिक यांचे ट्विट चर्चेत, रविवारी मलिक कोणता बॉम्ब फोडणार?

नवाब मलिक यांचे ट्विट चर्चेत, रविवारी मलिक कोणता बॉम्ब फोडणार?
X

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना दिला आहे. पण आता नवाब मलिक यांनी एक ट्विट करत रविवारी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसात रोज पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक रोज पत्रकार परिषदेआधी एक ट्विट करत असतात आणि आपण कोणता गौप्यस्फोट करणार आहोत याचा सूचक संदेश देत असतात. याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी बुधवारी पुन्हा एक ट्विट केले आहे, या ट्विटमध्ये त्यांनी " शुभ दीपावली आप सभी की दिवाली मंगलमय होय.... होटल 'The Lalit' मे छुपे है कई राज़... मिलते है रविवार को" असे म्हणत आपण मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला आहे.

त्याआधी मलिक यांनी आणखी एक ट्विट करत "बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे" असा इशारा दिला आहे, आता त्यांचा हा इशारा कुणाला आहे, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

त्याआधी मंगळवारी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे आणि एका ड्रग्ज पेडलरमधील संभाषणाचे वॉट्सअप चॅटही प्रसिद्ध केले होते. "NCB अधिकारी समीर दाऊद वानखेडे यांची बहिणी आणि एका ड्रग्ज पेडलरमधील संभाषणाचे वॉट्सअप चॅट...हे नैतिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का असा सवाल उपस्थित होतो " असे मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध आरोपांची मालिकाच सुरू केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना दिवाळीनंतर उत्तर देणार असल्याचे सांगत आपण बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नवाब मलिक आता रविवारी कोणता बॉम्ब फोडतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 3 Nov 2021 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top