Home > Politics > नवाब मलिक यांनी गोसावी आणि काशिफ खान यांच्यातील whatsapp चॅट केलं पोस्ट

नवाब मलिक यांनी गोसावी आणि काशिफ खान यांच्यातील whatsapp चॅट केलं पोस्ट

नवाब मलिक यांनी गोसावी आणि काशिफ खान यांच्यातील whatsapp चॅट केलं पोस्ट
X

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. समीर वानखेडे यांच्या कारवाईवर मलिक यांनी आक्षेप घेत पुरावे सादर केले. दरम्यान नवाब मलिक यांनी आज पुन्हा ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. मलिक यांनी के.पी गोसावी आणि काशिफ खान यांच्यातील संभाषणाच्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे, के. पी गोसावी आणि काशिफ खान यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये गोसावी आणि काशिफ यांच्यातील संभाषणाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला. ज्यात मलिक म्हणतात की, हे आहे के.पी. गोसावी आणि काशिफ खान यांच्यातील संभाषणाचं व्हॉट्सअप चॅट. काशिफ खानला प्रश्न का विचारले जात नाहीत. काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यात नेमका काय संबध आहे? असं मलिक यांनी म्हटले आहे. तसेच व्हॉट्सअप संभाषणाचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे.

Updated : 16 Nov 2021 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top