Home > Politics > कंगनाचा बोलवता धनी कोण? नवाब मलिक यांचा सवाल...

कंगनाचा बोलवता धनी कोण? नवाब मलिक यांचा सवाल...

कंगनाचा बोलवता धनी कोण? नवाब मलिक यांचा सवाल...
X

कंगना रणौतने आज महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी समाचार घेतला. 'अशी एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते व बोलते तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत जे अशा लोकांना पुढे करत आहेत त्यांना कळलं पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कंगना रणौत आणि विक्रम गोखले यांच्या वक्तव्याने देशात नवा वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ती या व्हिडीओमध्ये टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणते.. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. तिच्या या वक्तव्याला आता अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील समर्थन दिलं आहे. त्यानंतर आता कंगना देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर घसरली आहे.

कंगनाने इन्स्टाग्राम वर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने... 'तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, तुम्ही दोन्ही भूमिका घेऊ शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या' असं या बातमीवर लिहिण्यात आलं आहे.स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती असंही कंगनाने म्हटलं आहे. पुढे बोलताना कंगनाने महात्मा गांधींवर निशाणा साधत म्हटलं आहे की, "हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा". असा सल्ला दिला आहे.

काय म्हटलंय नवाब मलिक यांनी...

नियोजन पध्दतीने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे. खोटा इतिहास सांगणे, खोटी माहिती उपलब्ध करून देणे अशा पध्दतीने वारंवार असे लोकं बोलत आहेत.

कंगना राणावत हिने महात्मा गांधींजींचा अपमान करण्याचे काम केले केले आहे. अहिंसा हे विचार जगाने स्वीकारले आहेत. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवलं तर अहिंसेच्या मार्गाने काहीही प्राप्त करु शकतो, मात्र तिने बापूंचा अपमान का केला आणि तिचा बोलविता धनी कोण आहे. हे देशाला माहीत आहे. असेही नवाब मलिक म्हणाले.

ज्या लोकांनी बापूंची हत्या केली तेपण बापूंना बगल देऊ शकत नाही. बापूंचे विचार देशात, जगात लोकांनी स्वीकारले आहेत. एखादी महिला बापूंच्या विरोधात बोलल्यावर लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे असे स्पष्टपणे नवाब मलिक यांनी सांगितले.

Updated : 17 Nov 2021 8:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top