Home > Politics > देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवले : नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवले : नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवले : नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब
X

दिवाळीमधे फटाके आणि बॉम्ब फोडण्याची भाषा करणार्या राजकरणी आता हायड्रोजन बॉम्बपर्यंत जाऊन पोचले आहेत. अंडरवर्ल्डशी संबधाचे आरोप करणारे देवेंद्र फडणवीसावर आरोपांवर पलटवार करत आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी फडणवीसांनी गुन्हेगारांना सरकारी पदावर बसवल्याचा आरोप करत नोटबंदीत बनावट नोटांना सरंक्षण दिल्याचे सांगत हायड्रोजन बॉम्ब टाकला आहे.

गेले काही दिवस क्रुझ पार्टीवरुन राज्यातील महाविकास आघाडी विरोधात भाजप असं राजकारण सुरु आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखडेंवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी आरोपांची मालिका सुरु केली आहे.

फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड आरोपांना उत्तर देतान नवाब मलिकांनी पत्रकार परीषदेत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं. हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो, याच्या दुसऱ्या पत्नीवर खोट्या कागदपत्रांबाबत गुन्हा दाखल होत असतांना फडणवीस मुख्यमंत्री असांना त्यांच्या कार्यालयातून फोन गेला, असाही आरोप मलिकांनी केला.

रियाझ भाटी सध्या गायब असून देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून भाटी पंतप्रधानापर्यंत कसा पोहचला? असा सवालही यावेळी नवाब मलिकांनी केला.नवाब मलिकांनी म्हटलं की, 2005 साली मी मंत्रीपदावर नव्हतो. सलीम पटेलचा मृत्यू झालाय ही माहिती मला ५ महिन्यांपूर्वी मिळाली आहे. सलीम पटेलचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बातम्यांवरुन सलीम पटेलनं त्यावेळी अनेक माध्यमांवर डिफमेशन दाखल केले होते, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

मलिक म्हणाले, जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळी खोट्या नोटा पकडले जाण्याचं प्रमाण संपूर्ण देशभरात वाढलं होतं. मात्र महाराष्ट्रातून खोट्या नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 मध्ये इंटेलिजन्सकडून बीकेसीमध्ये छापेमारी झाली. ज्यात 14 कोटी 56 लाखांच्या खोट्या नोटा सापडल्या. या प्रकरणाला फडणवीसांकडून दाबलं जाण्याकरता प्रयत्न झाले, असं ते म्हणाले. अनेक प्रकरणांणामधे समीर वानखडेंनी आणि फडणवीसांनी मिळून पोलिसांच्या मदतीने वसुलीचे रॅकेट चालवले असा आरोप त्यांनी केला.Updated : 10 Nov 2021 5:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top