Home > Politics > "होय मी भंगारवाल्याची मुलगी" नवाब मलिकांच्या मुलीने टीकाकारांना दिलं उत्तर

"होय मी भंगारवाल्याची मुलगी" नवाब मलिकांच्या मुलीने टीकाकारांना दिलं उत्तर

होय मी भंगारवाल्याची मुलगी नवाब मलिकांच्या मुलीने टीकाकारांना दिलं उत्तर
X

क्रुझ पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानचा जामीन झाल्यानंतरही या प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरुच असून भाजपा नेते मोहित कम्बोत यांच्या १०० कोटींच्या खटल्यावर उत्तर देताना होय मी भंगारवाला असं म्हटल्यानंतर सना मलिक शेख, भंगारवाला नवाब मलिक यांनी भाजपा नेते मोहित कम्बोत यांच्या १०० कोटींच्या खटल्यावर उत्तर देताना`होय मी भंगारवाला आहे असं म्हटलं होतं.

त्यांची मुलगी सना मलिकनेही ट्वीट केलं आहे. "होय मी भंगारवाल्याची मुलगी! मला अभिमान आहे. मी मराठी मुलगी," असं ट्वीट करत त्यांनी वडिलांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी #NawabMalikMyHero हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा नेते मोहित कम्बोत यांच्या १०० कोटींच्या खटल्यावर उत्तर देताना होय मी भंगारवाला आहे असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नवाब मलिक या शहरात जेवढे भंगार आहेत, त्यांचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि यांचं पाणी केल्याशिवाय थांबणार नाही असा इशाराही दिला आहे.

भाजपा नेता मोहित कम्बोत यांच्याकडून १०० कोटींचा खटला दाखल करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "माझी तर औकात इतकी नाही. माझा ब्रॅण्ड त्यांनी १०० कोटींचा केला आहे. सगळं विकलं तरी माझ्याकडे १०० कोटी नाहीत. ते सांगतात भंगारवाले…पण भंगारवाला काय असतो. होय मी भंगारवाला आहे. माझे वडील कपडे आणि भंगारचा व्यवसाय केला. वयाच्या १६ व्या वर्षापासून ते राजकारणात आमदार होण्यापर्यंत मी भंगारचा व्यवसाय करत होतो. शेजारीच आमचं दुकान आहे, जाताना त्याचे फोटोही काढा. माझे कुटुंब भंगारचा व्यवसाय करतं याचा अभिमान आहे".

Updated : 2021-10-29T14:57:58+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top