Home > Politics > अंत्य संस्कारासाठी मुस्लिम, सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? नवाब मलिकांकडून वानखेडेंचा आणखी एक `फर्जिवाडा` उघड

अंत्य संस्कारासाठी मुस्लिम, सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? नवाब मलिकांकडून वानखेडेंचा आणखी एक `फर्जिवाडा` उघड

अंत्य संस्कारासाठी मुस्लिम, सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? नवाब मलिकांकडून वानखेडेंचा आणखी एक `फर्जिवाडा` उघड
X

दुबई दौऱ्यावरुन परतलेले अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरुध्द वानखडे प्रकरण काही थांबायला तयार नाही. आज त्यांनी "अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव" असं ट्वीट करत काही कागदपत्रं शेअर केली आहेत.mयापूर्वी जन्म दाखले आणि शाळा प्रमाणपत्र प्रसिध्द केल्यानंतर मलिकांनी महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रं शेअर केली आहेत.

मी अनुसूचित जमाती वर्गातील आहे आणि माझा मुलगाही अनुसूचित जमाती वर्गातील आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे.

समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिक ठाम असून त्यासंदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये समीर वानखेडे हे मुस्लिम धर्मगुरुंच्या समोर सही करताना दिसत होते. समीर वानखडेंची नोकरी जाणार आणि ते तुरुंगात जाणार असे मलिकांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे.

समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. नवाब मलिक यांच्याविरोधात त्यांनी सव्वा कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एकल खंडपीठाने त्यांच्या विरोधात निकाल दिल्यानंतर त्यांनी दोन न्यायमु्र्तीच्या खंडपीठाकडे अपील केलं आहे.

Updated : 25 Nov 2021 4:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top