Home > Politics > काँग्रेस पक्षाने माझ्यावर केलेली कारवाई न्यायाला धरून नाही, निलंबनानंतर सुधीर तांबे यांचे ट्वीट

काँग्रेस पक्षाने माझ्यावर केलेली कारवाई न्यायाला धरून नाही, निलंबनानंतर सुधीर तांबे यांचे ट्वीट

नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूकीत डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याबाबत डॉ. सुधीर तांबे यांनी ट्विटरवर प्रतिक्रीया दिली आहे.

काँग्रेस पक्षाने माझ्यावर केलेली कारवाई न्यायाला धरून नाही, निलंबनानंतर सुधीर तांबे यांचे ट्वीट
X

नाशिक पदवीधर विधानपरिषद (Nashik Biennial Elections) निवडणूकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी दिली होती. मात्र डॉ. सुधीर तांबे यांनी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यासाठी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. त्याबाबत डॉ. सुधीर तांबे यांनी प्रतिक्रीया दिली. यावेळी काँग्रेसने माझ्यावर केलेली कारवाई ही न्यायाला धरून नाही, असं मत डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. (Congress Suspended to Dr. Sudhir Tambe)

सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नाशिक (Nashik) पदवीधर विधानपरिषद निवडणूकीला नाट्यमय वळण मिळाले. त्यातच आता काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, माझ्या संदर्भात काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका न्यायाला धरून नाही. पण चौकशीअंती सत्य समोर येईल, यावर माझा विश्वास आहे. (Dr. Sudhir Tambe Tweet)

बाळासाहेब थोरात यांची चुप्पी (Balasaheb Thorat)

डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने (Congress) उमेदवारी देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणूक तांबे विरुध्द थोरात (Tambe Vs Thorat) राजकारणाची नांदी ठरणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणावर चुप्पी साधली आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबाबत आणि डॉ. सुधीर तांबे यांच्यावरील कारवाईबाबत काय भूमिका घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.












Updated : 16 Jan 2023 9:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top