Home > Politics > नसीम खान यांचा मुंबई काँग्रेसच्या प्रचार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

नसीम खान यांचा मुंबई काँग्रेसच्या प्रचार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

नसीम खान यांचा मुंबई काँग्रेसच्या प्रचार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा
X

मुंबई : काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात 'एक व्यक्ती' एक पद' अशी घोषणा करण्यात आली होती. या घोषणेच्या अंमलबजावणीला आता पक्षात सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्येदेखील याप्रमाणे आता अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांनी या बदलाची सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

नसीम खान यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष अशी दोन पदे होती. काँग्रेसचे महाराष्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसच्या बैठकीत नसीम खान यांनी राजीनाम्याची घोषणा केली, तसेच त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे पाठवला आहे. पक्षात एक व्यक्ती एक पद असावे या निर्णयानंतर महाराष्ट्रातून राजीनामा देणारे नसीम खान हे पहिले पदाधिकारी ठरले आहेत.

Updated : 24 May 2022 10:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top