Home > Politics > शिवसेनेबद्दलच्या प्रश्नांवर नारायण राणे का चिडले?

शिवसेनेबद्दलच्या प्रश्नांवर नारायण राणे का चिडले?

शिवसेनेबद्दलच्या प्रश्नांवर नारायण राणे का चिडले?
X

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारताच नारायण राणे संतापले....मला फक्त शिवसेनेबद्दलचे प्रश्न का विचारले जातात, इतर विषय नाहीत का, असा सवालच नारायण राणे यांनी पत्रकारांना विचारला. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा "संजय राऊत माझे बॉस आहेत का, त्यांच्याबद्दलच्य़ा प्रश्नांना मी का उत्तरं द्यायची" असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सरकार कधी पडेल ते सांगितलेले नाही, पण महाविकास आघाडी सरकार पडणार हे नक्की, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. तर चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ तारखेलाच होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. रस्त्याचे काम तोपर्यंत होणार नाही, पण तेही काम लवकरात लवकर केले जाईल, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.

Updated : 18 Sep 2021 2:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top