Home > Politics > नारायण राणे यांना जेवतानाच अटक केल्याचा आरोप

नारायण राणे यांना जेवतानाच अटक केल्याचा आरोप

नारायण राणे यांना जेवतानाच अटक केल्याचा आरोप
X

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. पण राणे यांना जेवत असतानाच पोलिसांनी अटक केली, तसेच त्यांच्या हातातील ताटही काढून घेतले, असा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड हे नारायण राणे यांच्यासोबत होते. आपण स्वत: पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ शूट केल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले. त्यांनी तो व्हिडिओ माध्यमांनाही दिला आहे. या व्हिडिओमध्ये पोलिसांशी निलेश राणे वाद करत असल्याचे दिसते आहे. तर नारायण राणे यांच्या हातात जेवणाचे ताट असल्याचे दिसते. पण पोलिसांनी राणेंचे ताट काढून घेतल्याचे या व्हिडिओमध्ये कुठेही दिसत नाही.

Updated : 24 Aug 2021 11:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top