Home > Politics > नागपूरची चड्डी घातली की तो डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरीच्या पदावर जातो, नाना पटोले यांचा RSS वर हल्लाबोल

नागपूरची चड्डी घातली की तो डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरीच्या पदावर जातो, नाना पटोले यांचा RSS वर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोडो भारत यात्रा सुरू केली आहे. या यात्रेनिमीत्त नाना पटोले यांनी बुलढाणा येथे मेळावा घेतला होता. यामध्ये बोलताना नाना पटोले यांनी RSS चा उल्लेख नागपूरची चड्डी असा उल्लेख करत हल्लाबोल केला.

नागपूरची चड्डी घातली की तो डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरीच्या पदावर जातो, नाना पटोले यांचा RSS वर हल्लाबोल
X

नाना पटोले यांनी यावेळी बोलताना म्हणाले की, देशातील संविधानिक व्यवस्था संपवण्याचे काम सुरू आहे. त्यातच न्यायव्यवस्थेतील चार न्यायाधीश माध्यमांसमोर येऊन न्यायव्यवस्थेची व्यथा मांडत आहे. मीडिया सध्या गोदी मीडिया बनला आहे. यामध्ये प्रशासनामध्ये जाण्यासाठी युपीएससी द्यावी लागत होती. मात्र आता नागपूरची चड्डी घातली की, थेट जॉईंट सेक्रेटरी होता येते, अशा शब्दात नाना पटोले यांनी RSS वर टीका केली.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्याचे राज्यपाल चुकीची माहिती पसरवत आहेत. एवढंच नाही तर शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. मात्र आता हे वाघिणीचे दुधही तुमच्यापासून हिरावून घेण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी RSS आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

Updated : 30 Sep 2022 3:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top