भाजपचे संदीप जोशी यांचे वादग्रस्त ट्विट, कारवाईची मागणी
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  31 Jan 2022 2:19 PM IST
X
X
नागपूरचे माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाचे नेते संदीप जोशी यांनी केलेले एक ट्विट वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. संदीप जोशी यांनी अनुसूचित जातीच्या लोकांच्या संदर्भात अत्यंत घाणेरडी आणि निंदनीय अशी टीका केली आहे, त्याचा निषेध बहुजन समाज पार्टीने केला आहे. तसेच संदीप जोशी यांच्यावर कारवाईची मागणी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप ताजणे यांनी केली आहे.
नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीदेखील ताजणे यांनी केली आहे. तसेच गृहमंत्र्यांनाही निवेदन दिले जाणार असल्याचे संदीप ताजणे यांनी सांगितले आहे. नागपूरसारख्या शहराचा प्रथम नागरिक राहिलेले संदीप जोशी चर्मकार समाजाच्या संदर्भात अशी अत्यंत घाणेरडी टीप्पणी करत असतील तर त्यांना सरकारने अटक केली पाहिजे अशी मागणी बसपाने केली आहे.
 Updated : 31 Jan 2022 2:19 PM IST
Tags:          Nagpur   bjp   Sandeep joshi   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






