Home > Politics > लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजप सरकारचा निषेध- किरण काळे

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजप सरकारचा निषेध- किरण काळे

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजप सरकारचा निषेध- किरण काळे
X

अहमदनगर : उत्तर प्रदेशमधील घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लालटाकी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रियंका गांधी यांच्या समर्थनार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्यामुळे परिसर दणाणून गेला होता.

उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांना झालेल्या अटकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात देखील विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. नगर शहरात देखील याचे तीव्र पडसाद उमटले असून प्रियंका गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, प्रियंका गांधींना अटक काय करताय? अटक करायचीच असेल तर शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्याला करा. शेतकरी, अल्पसंख्याक, दलित यांच्यावर दडपशाही करण्याचे काम उत्तर प्रदेश व देशातील मनुवादी भाजप सरकार करीत आहे असा घणाघात यावेळी काळे यांनी केला.

इंदिरा गांधी यांना देखील १९७७ साली याच दिवशी अटक केली होती. प्रियंका गांधींशी गैरवर्तन करत त्यांनाही अटक करत लोकशाहीचा आवाज दडपणाऱ्या मोदी - योगी सरकारचा निषेध असा शब्दात शहर जिल्हा कॉंग्रेसचे किरण काळे यांनी भाजपवर निशाणा साधला.

Updated : 5 Oct 2021 6:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top