Home > Politics > माझ्या यशाला एकच बाप आहे : सत्यजीत तांबे

माझ्या यशाला एकच बाप आहे : सत्यजीत तांबे

काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे आमदार झाल्यानंतर निवडुकीत मिळालेल्या यशावर भाष्य करत इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स`, यशाला अनेक बाप असतात. प्रत्येकजण म्हणतो की, माझ्यामुळे निवडून आला. मात्र, माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे,” असं सांगितलं.

माझ्या यशाला एकच बाप आहे :  सत्यजीत तांबे
X

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency)अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातुन आमदार म्हणुण निवडुन आल्यानंतर याच्यावर भाष्य केलं आहे, यावेळी त्यांनी अनेक लोक आम्ही तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही निवडून आले अस बोलतं असल्याचं सांगितलं. त्याच बरोबर “माझा यशाचा एकच बाप आहे,” असं मत सत्यजित तांबेनी व्यक्त केल. ते निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच चोपडा (Chopda) तालुक्यात आले असताना बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळ (Mahatma Gandhi Shikshan Mandal Choda) संचलित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयात पदवीधर शिक्षकांची भेट घेतली.

सत्यजीत तांबे म्हणाले, “अनेक लोकं येतात आणि सांगतात की आम्ही तुम्हाला मदत केली, आमच्यामुळे तुम्ही निवडून आला आहात. परंतु, माझ्या विजयाचं खरं श्रेय माझ्या वडिलांच्या कामाला आहे. मागच्या १४ /१५ वर्षात माझ्या वडीलांनी कुणाची जात पाहीली नाही, कुणाचा धर्म पाहीला नाही, कुणाचा पक्ष पाहीला नाही,त्यांनी प्रत्येकाशी संबंध ठेवले म्हणून सर्वजण माझे पाठीशी उभे राहिले. याची मला जाणीव आहे.” असं सत्यजीत तांबे यावळी म्हणाले. “माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे” “इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स`, यशाला अनेक बाप असतात. प्रत्येकजण म्हणतो की, माझ्यामुळे निवडून आला. मात्र, माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे,” असं बेधडक वक्तव्य सत्यजीत तांबेंनी व्यक्त केलं. “बापाच्या आणि मुलाच्या कामाची तुलना होण्याचा महाराष्ट्राला आणि भारताला फार मोठा इतिहास आहे,”अस सुचक विधानही सत्यजित तांबे यांनी यांनी यावेळी केलं.

Updated : 5 March 2023 10:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top