Home > Politics > उध्दवजींनी माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

उध्दवजींनी माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

उध्दवजींनी माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
X

महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. तसेच तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. तसेच त्यांना टार्गेट देण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे .

महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. उध्दवीजीमुळे माझे मातोश्रीचे दरवाजे बंद झाले असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे . फडणवीस पुढे म्हणाले की , परवा एका कार्यक्रमात रश्मी वहिनी भेटल्या त्यांना मी सांगितले की उध्दवीजीना माझा नमस्कार सांगा , कारण मी त्या वृत्तीचा नाही ,असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे.

नेमक काय म्हणाले देवेंद्र फडणवीस........ मुलाखती दरम्यान उध्दव ठाकरे व तुमच्यात कटुता आली आहे , हा प्रश्न विचारण्यात आला , यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की , महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. त्यांना तसे टार्गेट देण्यात आले होते . मात्र अडीच वर्षाच्या काळात माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं काम महाविकास काळात करण्यात आले , मात्र माझ्या विरोधात त्यांना काहीही सापडलं नाही. "माझ्याकडून कुठलंही वैर नव्हतं. पण मातोश्रीचे दरवाजे मला उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही, माझ्यात कुठलीही कटुता नाही ,मी राजकीय दृष्टया उध्दव ठाकरेचा विरोधक आहे.व्यक्तिगत पातळीवर कोणतही वैर नाही , असही देवेंद्र फडणवीस म्हणाले .

रश्मी ठाकरेंना काय म्हणाले देवेंद्र फडणवीस .

देवेंद्र फडणवीस म्हणाले की , परवा एका कार्यक्रमात रश्मी वहिनी भेटल्या ,त्यांच्या त्यांना सांगितले की , उध्दवीजी माझा नमस्कार सांगा कारण मी उध्दवीचा मी राजकीय विरोधक आहे ,पण महाराष्ट्राची संस्कृती वैर जपणारी नाही. मी त्या संस्कारांनीच वागतो" असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Updated : 24 Jan 2023 3:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top