Home > Politics > जळगाव जिल्हा बँक निवडणूक, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

जळगाव जिल्हा बँक निवडणूक, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

जळगाव जिल्हा बँक निवडणूक, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
X

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 21 पैकी 20 जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली आहे. तर भाजपचे आमदार संजय सावकारे अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून विजय मिळवला आहे. हा विजय म्हणजे गेल्या 6 वर्षांत केलेल्या कामांची पावती असल्याचे प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली आहे. जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत राहणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. तर इतर मागास प्रवर्गातून डॉक्टर सतीश पाटील हे सहकार पॅनलमधून विजयी झाले आहेत.

Updated : 22 Nov 2021 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top