Home > Politics > मुंबईतील कांजूरमार्ग येथे इमारतीला भीषण आग

मुंबईतील कांजूरमार्ग येथे इमारतीला भीषण आग

मुंबईत आगीच्या घटना वाढत आहेत. त्यातच मालाड येथील अप्पापाडा पाठोपाठ कांजूरमार्ग येथील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

मुंबईतील कांजूरमार्ग येथे इमारतीला भीषण आग
X

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai) आगी लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होतांना दिसत आहे. त्यातच मालाड (Malad) येथील अप्पापाडा (Appapada Fire) येथे लागलेल्या आगीमुळे अनेक कुटूंब उध्वस्त झाले आहेत. त्यापाठोपाठ कांजूरमार्ग (Kanjurmarg) येथील इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीच्या धुरामुळे नागरिकांचा श्वास गुदमरला असल्याचे समोर आले आहे.

कांजूरमार्ग येथील कर्वेनगर (Karvenagar building Fire) भागातील एमएमआरडीएच्या 15 मजली इमारतीच्या इलेक्ट्रिक सिटीत शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे या भागात भीषण आग लागली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) 3 गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. मात्र आग लागल्यामुळे या परिसरात धुराचे लोट पसरले होते. तसेच धुरामुळे श्वास कोंडल्यामुळे या इमारतीतील 4 महिलांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या आगीनंतर कांजूरमार्ग (Kanjurmarg) परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

Updated : 26 March 2023 7:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top