Home > Politics > मुंबई उच्च न्यायालयाकडून ज्ञानदेव वानखेडेंना दणका, नवाब मलिकांचं ट्विट चूक असल्याचं सिद्ध करा !

मुंबई उच्च न्यायालयाकडून ज्ञानदेव वानखेडेंना दणका, नवाब मलिकांचं ट्विट चूक असल्याचं सिद्ध करा !

मुंबई उच्च न्यायालयाकडून ज्ञानदेव वानखेडेंना दणका, नवाब मलिकांचं ट्विट चूक असल्याचं सिद्ध करा !
X

मुंबई : NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात मानहाणीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याची काल सुनावणी झाली. दरम्यान वानखेडेंनाच न्यायालयाने खडेबोल सुनावले. समीर वानखेडे हे एक सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांच्या कामाची सार्वजनिक समिक्षा होऊ शकते अशा स्पष्ट शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay Highcourt) वानखेडे यांना खडसावले आहे. याच प्रकरणात नवाब मलिक यांचे वकिल 12 नोव्हेंबरला प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत.

मंत्री मलिक यांनी समीर वानखेडेवर (Sameer Wankhede Case) काही दिवसांपुर्वी गंभीर आरोप लावले आहेत. मुंबई ड्रग्ज प्रकरणात भ्रष्टाचार आणि जातीच्या खोटे प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांच्याविरोधात ज्ञानदेव वानखेडेंनी सव्वा कोटी रुपयांचा मानहाणीचा खटला दाखल केला आहे. एवढच नाही तर वानखेडे कुटुंबाच्याविरोधात टिकाटिप्पणी करायला बंदी घाला अशी मागणीही वानखेडेंनी न्यायालयाकडं केली आहे, मात्र, ती जवळपास नाकारण्यात आली आहे.

या खटल्याच्या सुनावणी दरम्यान, वानखेडेचें वकिल अरशद शेख यांनी असा प्रश्न केला की, समीर वानखेडेंनी अशा एका व्यक्तीला का उत्तर द्यावं जो फक्त एक आमदार आहे, कुठलही कोर्ट नाही. त्यावर न्यायमूर्ती माधव जामदार यांनी असं म्हटलं की, तुम्ही एक सरकारी अधिकारी आहात आणि तुम्हाला फक्त एवढच सिद्ध करायचंय की नवाब मलिकांनी केलेले ट्विट प्रथमदर्शनी चुकीचे आहेत. समीर हा फक्त तुमचा मुलगा नाही, तो एक सरकारी अधिकारीही आहे आणि त्यामुळे सामान्य जनतेतला कुठलाही व्यक्ती त्याच्या कामाची समिक्षा करु शकतो.

Updated : 11 Nov 2021 4:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top