Home > Politics > संजय राऊत यांचा आर्थररोड कारागृहातील मुक्काम संपला

संजय राऊत यांचा आर्थररोड कारागृहातील मुक्काम संपला

गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांचा आर्थररोड कारागृहातील मुक्काम संपला आहे.

संजय राऊत यांचा आर्थररोड कारागृहातील मुक्काम संपला
X

गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत (sanjay raut) यांना जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर PMLA कोर्टाने संजय राऊत यांचा जामीन फेटाळला होता. मात्र आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे संजय राऊत यांचा आर्थररोड कारागृहातील मुक्काम संपला असल्याचे म्हटले जात आहे.

गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात (goregaon patra chawl case) संजय राऊत यांना जून महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर PMLA कोर्टाने संजय न्यायालयाने संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे संजय राऊत यांना आर्थररोड कारागृहात हलवण्यात आले होते. त्यानंतर संजय राऊत यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर ED ने याआधी झालेल्या सुनावणीवेळी लेखी उत्तर सादर केले होते. यावेळी न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीनाचा निर्णय राखून ठेवला होता. मात्र आज तब्बल दीड तासांच्या प्रतिक्षेनंतर संजय राऊत यांना दोन लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे संजय राऊत यांचा आर्थररोड कारागृहातील मुक्काम संपला असल्याचे म्हटले जात आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु असताना शिवसैनिकांनी कोर्टात मोठी गर्दी केली होती. मात्र न्यायाधीश एम जी देशपांडे हे जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयात एकदम शांतता पसरली होती. यावेळी न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे संजय राऊत यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Updated : 9 Nov 2022 8:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top