Home > Politics > 'माझ्या विचारांना चालना देण्यासाठी अजित पवारांचे दौरे वाढले'- खासदार उदयनराजे भोसले

'माझ्या विचारांना चालना देण्यासाठी अजित पवारांचे दौरे वाढले'- खासदार उदयनराजे भोसले

माझ्या विचारांना चालना देण्यासाठी अजित पवारांचे दौरे वाढले- खासदार उदयनराजे भोसले
X

सातारा : 'माझ्या विचाऱ्यांना चालना देण्याचं काम मंत्री या नात्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत' असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे साताऱ्यात दौरे वाढले असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार उदयनराजे यांनी उत्तर देत ते म्हणाले की, अजित पवार माझ्या मतांशी सहमत आहेत. मी त्यांना जास्तीत जास्त दौरे येथे करा असे सांगितले आहे. माझ्या विचाऱ्यांना चालना देण्याचं काम मंत्री या नात्याने अजित पवार करत आहेत. सूचना आम्ही देत जाऊ त्या सूचना आचरणात आणण्याचे काम त्यांच्या सारख्या तज्ञ आणि अनुभवी लोकांनी केलं पाहिजे असं सांगत खा.उदयनराजे यांनी आगपाखड केली आहे.

Updated : 2021-10-02T20:10:33+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top