Home > Politics > सपा खासदार जया बच्चन राज्यसभेत आक्रमक ; गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब

सपा खासदार जया बच्चन राज्यसभेत आक्रमक ; गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब

सपा खासदार जया बच्चन राज्यसभेत आक्रमक ; गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब
X

नवी दिल्ली : आज राज्यसभेत सपा खासदार जया बच्चन चांगल्याच संतप्त झालेल्या पाहायला मिळाल्या यावेळी राज्यसभेतील भाजप खासदारांशी त्यांची जोरदार वादावादी झाल्याने वातावरण तापले. या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज सायंकाळी ५ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. यापूर्वी खासदार जया बच्चन यांनी भाजप खासदारांच्या विरोधात जोरदार संताप व्यक्त केला.

जया बच्चन कोणत्यातरी विषयावर बोलण्यासाठी उभ्या राहिल्या, मात्र यादरम्यान संसदेत गदारोळ झाला. यावर जया बच्चन संतापल्या आणि म्हणाल्या की, जर तुम्ही आम्हाला बोलू देत नसाल तर तुम्ही एकट्याने संसद चालवा.

यादरम्यान जया बच्चन यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांकडे बोट दाखवत तुम्हीही कोणाच्या समोर बिन वाजवत आहात, असे म्हणाल्या त्यानंतर एकच गदारोळ पाहायला मिळाला. जया बच्चन एवढ्या संतापल्या होत्या की त्यांना जोरजोरात श्वास घ्यावा लागत होता.

दरम्यान, त्यांनी राज्यसभेच्या सभापतींबाबत व्यक्तव्य केल्याने भाजप खासदारांनी त्यावर आक्षेप घेत संसदेच्या कामकाजातून त्यांचे विधान काढून टाकण्याची मागणी केली. जया बच्चन यांनी सभापतींना उद्देशून म्हटले की, तुम्ही आम्हाला संसदेत बोलूच देणार नसेल तर तुमच्याकडून आम्ही न्यायाची अपेक्षा कशी ठेवावी. यावर भाजप खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला आणि जया बच्चन यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली असं जया बच्चन यांनी म्हटले आहे. याबाबत त्या वारंवार राज्यसभा सभापतींसमोर आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र, भाजप खासदारांनी गोंधळ सुरूच ठेवला अखेर संसदेचे कामकाज तहकूब करावे लागले.


Updated : 20 Dec 2021 2:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top