Home > Politics > आता माफी मागितली तरी राज ठाकरे अयोध्येत येऊ शकत नाहीत - बृजभूषण सिंग

आता माफी मागितली तरी राज ठाकरे अयोध्येत येऊ शकत नाहीत - बृजभूषण सिंग

आता माफी मागितली तरी राज ठाकरे अयोध्येत येऊ शकत नाहीत - बृजभूषण सिंग
X

मनसे (mns)अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा अडचणीतच सापडतो आहे.भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांचाही विरोध वाढतच चालला आहे.आधी(Raj Thackrey) राज ठाकरेकडून उत्तर भारतीयांच्या माफीची मागणी केलेल्या बृजभूषण सिंह यांनी आता राज ठाकरेंनी माफी जरी मागितली तरी ते अयोध्येत येऊ शकत नाहीत, असं वक्तव्य केलं आहे.

पहिल्यांदा उत्तर भारतीयांना मारझोडीची भाषा करणारे राज ठाकरे आता अयोध्येत कसे येतात, तेच पाहू. त्यांना जर अयोध्येत पाऊल ठेवायचं असेल तर त्यांनी उत्तर भारतीयांची आधी माफी मागावी, नंतरच त्यांना अयोध्येत एन्ट्री मिळेल, असं आव्हानच बृजभूषण सिंग (Brijbhushan singh)यांनी राज ठाकरे यांना दिलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी राज ठाकरेंना उंदीरही म्हटलं. तसंच त्यांचा हिंदूविरोधी नेते म्हणूनही उल्लेख केला. भाजप खासदाराचा वाढता विरोध पाहता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची मोठी चर्चा होत आहे.

"राज ठाकरे यांचं हृदय परिवर्तन झालं असेल तर त्यांनी माफी मागावी. माझी माफी मागण्याचं कारण नाहीये. ज्या उत्तर भारतीय लोकांना मारझोड करण्याची त्यांनी भाषा केली, कित्येकांना मारहाणही केली, त्यांची माफी राज ठाकरेंनी मागितली पाहिजे, अशी माझी मागणी आहे", असं बृजभूषण सिंग म्हणाले.

माझं वैर महाराष्ट्राशी नाहीये, कित्येक महाराष्ट्रातील बांधव अयोध्येत येतात. प्रभू रामाचं दर्शन घेतात. आमची हरकत असण्याचं काही कारण नाहीये. माझा फक्त एका व्यक्तीला विरोध आहे, त्याचं नाव आहे राज ठाकरे. शेवटी मुक्तीचा उपाय आहे माफी..., त्यामुळे त्यांनी माफी मागावी, पण माफी जरी मागितली तरी ते ५ तारखेला अयोध्येत येऊ शकत नाही कारण ५ तारखेला अयोध्या फुल पॅक आहे", असं बृजभूषण सिंग म्हणाले.

Updated : 11 May 2022 1:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top