Home > Politics > राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार ; मनसे नेते संदिप देशपांडे यांची टीका

राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार ; मनसे नेते संदिप देशपांडे यांची टीका

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत बोलतांना अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये पुन्हा कमबॅक करणार असल्याचा मानस मनसे नेते संदिप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान त्यांनी राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार ; मनसे नेते संदिप देशपांडे यांची टीका
X

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे नाशिक पालिकेत पुन्हा मिशन कमबॅक करण्यासाठी जोर लावतांना दिसत आहे. याबाबत बोलताना मनसे नेते संदिप देशपांडे यांनी गेल्या 5 वर्षात नाशिककरांची निराशा झाल्याचे म्हटलं आहे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेऊ असं म्हटलं होतं मात्र, ती योजना पुर्णपणे फेल झाली आहे असं म्हणत देशपांडे यांनी भाजपवर निशाणा साधला. नाशकात मनसे स्वबळावर लढणार असल्याचे यावेळी देशपांडे यांनी स्पष्ट केले. सध्या तरी कोणाचा युतीसाठी प्रस्ताव नाही असंही त्यांनी म्हटलं. नाशिकचं संगोपन, राज साहेबांनी मनापासून केलं, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संगम करून नाशिक पुन्हा ताब्यात घेण्याचा मानस देशपांडे यांनी व्यक्त केला.

पॅकेज जाहीर होतं , मदत काही पोहचत नाही

पूरबाधितांसाठीच्या पॅकेजबाबात बोलतांना संदिप देशपांडे म्हणालेत की आपत्तीबाधितांना पॅकेज जाहीर केलं जात मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत मदत काही पोहचत नाही, मागील काही दिवसात राज्यात झालेल्या महापूराच्या घटनांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. त्या सर्व बाधितांना मनसे शंभर ते सव्वाशे ट्रक मदत पाठवत आहे. तर दुसरीकडे शिवसेना मदत केल्याचे केवळ व्हिडिओ व्हायरल करत आहे, मदत करण्याआधी जाहिरात केली जाते असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

कोकणात प्रशासनाचा निष्काळजीपणा

दरम्यान कोकणात एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीला प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभुत असल्याचे देशपांडे यांनी म्हटलं आहे. मदत करण्याची SOP तयार करण्यात आली नसल्याने हे प्रशासनाचं फेल्युअर असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारचे धोक्याचे इशारे तिथल्या नागरिकांना दिले नसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारवर नियोजनशून्य कारभार केल्याची टीका

नद्यांवर भिंत म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याचे म्हणत देशपांडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. नद्यांवर भिंत घालणे म्हणजे काय गंमत आहे का? असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार सुरू असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. समुद्रात बांधला जाणारा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे अशक्यप्राय गोष्ट आहे असं आधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते त्यापेक्षा गड - किल्ले संवर्धनाचे काम करायला हवे होते असं देशपांडे यांनी म्हटले आहे.

Updated : 28 July 2021 9:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top