Home > Politics > टोमणेसभेच्या दुसऱ्या अंकाची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार, मनसेचा उध्दव ठाकरे यांना टोला

टोमणेसभेच्या दुसऱ्या अंकाची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार, मनसेचा उध्दव ठाकरे यांना टोला

टोमणेसभेच्या दुसऱ्या अंकाची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार, मनसेचा उध्दव ठाकरे यांना टोला
X

राज्यातील आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यातच बीकेसी येथील सभेनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे औरंगाबाद येथील सभेत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मनसेने औरंगाबादच्या सभेच्या पुर्वसंधेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

आगामी काळातील महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन कोरोनानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. तर बीकेसी येथील सभेनंतर बुधवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर या सभेची तयारी पुर्ण होत आली आहे. तर या सभेत उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापार्श्वभुमीवर मनसेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मनसे प्रवक्ते गजानन काळे म्हणाले, होय हे संभाजीनगर म्हणत बॅनरबाजी करायची. मी म्हणतोय ना संभाजी नगर असं म्हणून सभेत घोषणा करायची. पण एवढंच म्हणून मुख्यमंत्री महोदय चालेल का? याबरोबरच औरंगाबदचे संभाजीनगर कधी होणार? या टोमणेसभेच्या दुसऱ्या अंकात तुम्ही केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याचे पेपर भिरकावणार आहात का? औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबुत कधी होणार? याची घोषणा या सभेत करणार आहात की गेल्या सभेप्रमाणे या टोमणासभेच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीहून येणार, असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.

Updated : 7 Jun 2022 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top