Home > Politics > डोक्यावर भोपळा घेत आमदार सुनील भुसारा यांनी वेधले लक्ष

डोक्यावर भोपळा घेत आमदार सुनील भुसारा यांनी वेधले लक्ष

डोक्यावर भोपळा घेत आमदार सुनील भुसारा यांनी वेधले लक्ष
X

अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार सुनील भुसारा यांनी डोक्यावर भोपळा घेत उपस्थितांचे लक्ष वेधले. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र यात आदिवासी, दलित, वंचित, कष्टकरी यांच्यासाठी काहाही नाही.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्यांच्या हाती भोपळा दिला आहे, अशी प्रतिक्रिया देत डोक्यावर भोपळा घेऊन आमदार सुनील भुसारा यांनी प्रतिकात्मक आंदोलन करत लक्ष वेधले.

आदिवासी समाजासाठी खावटी योजना आहे. मात्र त्यासाठी निधी देण्यात आला नाही. याबरोबरच अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र या घोषणांचा फायदा आदिवासी समाजाला होत नाही. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला आहे. त्यामुळे मी आज प्रतिकात्मक आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया सुनील भुसारा यांनी दिली.

Updated : 10 March 2023 7:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top