Home > Politics > 'बारा' हत्तीच्या बळाची‌ उपमा देत रोहीत पवारांनी राज्यपालांना केला 'हँप्पी‌ बर्थडे'

'बारा' हत्तीच्या बळाची‌ उपमा देत रोहीत पवारांनी राज्यपालांना केला 'हँप्पी‌ बर्थडे'

बारा हत्तीच्या बळाची‌ उपमा देत रोहीत पवारांनी राज्यपालांना केला हँप्पी‌ बर्थडे
X

नेहमीच वादग्रस्त विधानं करणारे आणि महाविकास आघाडीला (mva govement) अडचणीत आणणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी‌ंना (govenor) आमदार रोहित पवार (rohit pawar)यांनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी राज्यपालांनी सोडलेली नाही.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रलंबित ठेवलेला प्रस्ताव असो की अलीकडे रखडवून ठेवलेले विद्यापीठ सुधारणा विधेयक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सातत्याने ठाकरे सरकारला विरोध करत आहे. संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास 'बारा' हत्तीचं बळ मिळो, असे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहे.

नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात‌ झालेल्या एका कार्यक्रमात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. याची सर्वत्र टीका झाल्यानंतरही राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त केली नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण काढून देणारे पत्र असो, बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची रखडवलेली फाईल राज्यपाल सातत्याने महाविकासआघाडी विरोधात काम करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजभवन बर झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी मोदी है तो मुमकिन है..! असं सांगत मोदींची वारेमाप स्तुती केली. परंतु संदर्भ नसताना याच कार्यक्रमात औरंगाबादचा पाणी प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय श्री. भगतसिंग कोशारी साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असं आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास 'बारा' हत्तीचं बळ मिळो आणि आपणांस दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! अशा शुभेच्छा आमदार रोहित पवार यांनी दिले आहेत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0QqEhj3TspRkTBnu82fihVob39j8HQPGpJuwpMjWPsoVxobBPCsoqYh11pEifVfril&id=100044164193097

राज्यपालांना हटक्या भाषेत शुभेच्छा दिल्याने नेट कर्यांकडून समर्थनाच्या आणि विरोधाच्या प्रतिक्रिया येत आहे. भाजप आता यावर काय उत्तर देणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 17 Jun 2022 7:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top