Home > Politics > होय... आ.सातपुते तुम्ही चाकरीच केली असती...

होय... आ.सातपुते तुम्ही चाकरीच केली असती...

विधानसभेतील ( Asembly)काल सनातनी धर्माच्या चर्चेवरून विधानसभेत राडा झाला असला तरी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra avhad) आणि राम सातपुते ( ram satpute) यांच्या जुगलबंदीने एका नव्या चर्चेला उभारी दिली आहे. डॉ.आंबेडकरांचे ( Dr.ambedkar)नाव घेताना त्यांच्या विचाराची प्रतारणा करू नका असा, आरसा राम सातपुते यांच्या मतदारसंघातील पत्रकाराने दाखवला आहे.

होय... आ.सातपुते तुम्ही चाकरीच केली असती...
X

हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा वर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच आसूड ओढले. घटनेच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष समतावादी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.त्यानुसार देश वासिय सर्वधर्मसमभाव या भावनेने सध्या जीवन जगत असताना दिसतात.स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग डॉ.आंबेडकरांनी सांगितला. घटनेने सर्वांना समान अधिकार बहाल केले. आपापल्या गुणवत्तेनुसार जो तो पुढे जाऊ लागला. याचा लाभही असंख्यजणांनी घेतला पण लाभ घेणारच मूळच्या वर्णव्यवस्थेचे समर्थन करू लागले तर त्यांना तो लाभ घेण्याचा अधिकार नाही. आणि डॉक्टर आंबेडकर यांचे नाव घेण्याचा तर अजिबातच अधिकार नाही.आणि हीच गफलत आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाची झाली आहे. घटनेने त्यांना आमदार केले पण सनातन हिंदू असल्याचा त्यांना अभिमान आहे असे ते म्हणतात तर मग सनातन हिंदू धर्मा मध्ये जी वर्ग व्यवस्था आहे त्या वर्ग व्यवस्थेनुसार त्यांनी जीवन जगावे. बापाने चपल्या शिवल्याचा अभिमान वाटत असेल तर तेच काम त्यांनी पुढे नेऊन त्या माध्यमातून जनतेची सेवा करावी. टाकावे त्यांनीही चपला दुरुस्ती केंद्र... प्रत्येकाला आपापला धर्म जपण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक धर्मात चांगले विचार तत्त्व असतात. पण ज्या धर्मातील वर्णव्यवस्था संपविण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. त्याच धर्माचे आणि डॉक्टर आंबेडकरांचे ते नाव घेताना विचारांचा गोंधळ निर्माण करताना दिसत आहेत.

समानतावादी घटने(संविधान)नुसार आमदार होऊन त्यांना असमानतावादी वातावरण निर्माण करायचे आहे का असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होऊ लागला आहे.दलित म्हणून निवडून जात असताना त्यांच्या न्याय हक्कासाठी आमदार सातपुते यांचे योगदान काय? फक्त विकास निधी खर्ची पाडला म्हणजे दलितांचा खूप मोठा नेता होता येते हा गैरसमज आमदार सातपुतेंचा झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे पण स्वतः ला दलित म्हणवताना आपण या समाजातील बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य यासाठी ठोस काय केले. याचे उत्तर द्यावेच लागणार आहे. वास्तविक पाहता त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांना भाजपाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सारख्या छात्या बडवून घ्याव्या लागत आहेत. त्यासाठी ते दिन दलितांच्या व्यथा मांडण्यापेक्षा सनातन हिंदूंचे विचार पटविण्यातच जास्त सक्रिय असल्याचे सातत्याने दिसतात. असो त्यांच्या त्या मानसिकतेचा भाग आहे. पण डॉक्टर आंबेडकरांचे नाव घेताना किमान त्यांच्या विचारांची प्रतारणा होणार नाही याची त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. आणि कृपया हिंदुत्वातील कुटप्रश्न... अशा विविध परिवर्तनवादी पुस्तकांचे त्यांनी जरा वाचन करावे...म्हणजे त्यांना सत्य इतिहास कळेल... आणि सनातनी हिंदू धर्मातील जातीची उतरंड त्यांना मान्य असेल तर बसावे खुशाल चपला शिवत...

- डी एस गायकवाड

Updated : 3 March 2023 6:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top