Home > Politics > दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले- नितेश राणे

दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले- नितेश राणे

दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले- नितेश राणे
X

मुंबई: दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हिंदुत्वच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला, दरम्यान 'दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. असा खोचक टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता फरकच उरलेला नाही, हे मी आत्मविश्वासाने सांगतो, असे ट्विट नितेश यांनी केले.

दरम्यान आता शिवसेना या टीकेला काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात 'आज काहीजण केवळ माझं भाषण संपण्याची वाट पाहत असतील. भाषण कधी थांबतंय आणि कधी एकदा चिरकतोय, अशी काहींची अवस्था असेल, कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणं, चिरकणं यातून त्यांना रोजगार मिळतो,' असे उद्धव ठाकरे यांनी म्हणत राणे कुटुंबीयांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.

Updated : 16 Oct 2021 3:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top