Home > Politics > माझ्या कुटुंबीयांची संपत्ती शोधाच ; नवाब मलिक यांचे मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर

माझ्या कुटुंबीयांची संपत्ती शोधाच ; नवाब मलिक यांचे मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर

माझ्या कुटुंबीयांची संपत्ती शोधाच ; नवाब मलिक यांचे मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर
X

गोंदिया : भाजपच्या मोहित कंबोज यांनी गोंदियाचे पालकमंत्री व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची बेनामी संपत्ती उघड करणार असल्याचे म्हटले होते, त्यावर कंबोज यांना मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी भंगारवाला आहे, चोर नाही. बँक बुडवून मी कोट्यवधी खाल्ले नाही. माझ्या कुटुंबीयांची संपत्ती कुठे कुठे ते तुम्ही शोधाच,मी घाबरत नाही, असं नवाब यांनी म्हटले आहे. गोंदिया येथे पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की , NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी कोणाकोणाचे संबंध होते? व हॉटेलचे कोण मालक आहेत, हे तपासा. मग हॉटेलमधून ड्रग्ज क्रुझवर कसे गेले ते माहीत पडेल. समीर वानखेडे खोट्या कारवाया करत होते. NCB ने स्वत:ची प्रायव्हेट आर्मी तयार केली होती व निष्पाप लोकांना यामध्ये फसविले जात होते हे आता समोर येत आहे असं म्हणताना समीर वानखेडे यांच्यासोबत कासिफ खान हासुद्धा या कटात सहभागी होता. येणाऱ्या काळात कासिफ खान याच्याविरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत, असेही मलिक यावेळी म्हणाले.

Updated : 31 Oct 2021 3:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top