Home > Politics > अमृता फडणवीसच फक्त महिला आहेत का?; मंत्री नवाब मलिक यांचे भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

अमृता फडणवीसच फक्त महिला आहेत का?; मंत्री नवाब मलिक यांचे भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

अमृता फडणवीसच फक्त महिला आहेत का?; मंत्री नवाब मलिक यांचे भाजप नेत्यांना प्रत्युत्तर
X

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काल ट्विट करत अमृता फडणवीस यांच्याशी ड्रग्ज पेडलरचं कनेक्शन काय? असा सवाल केला होता, सोबतच त्यांनी जयदीप राणा आणि अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांकडून नवाब मलिकांवर जोरदार टीका करण्यात आली होती. अमृता फडणवीसांचं नाव घेतल्याने मलिक खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. तर अमृता फडणवीस यांनी देखील माझ्या अंगावर कुणी आलं तर सोडणार नाही असा इशारा दिला होता. दरम्यान आज सकाळी 9 वाजताच पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. फक्त अमृता फडणवीसच महिला आहेत काय?, असा सवाल करताना भाजप नेत्यांनीही अजित पवार यांच्या बहिणींची नावं घेतली, माझ्या मुलीचं नाव घेतलं, असं नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका करणारे मलिक यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बॉम्ब फोडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो त्यांनी ट्वीट केला. या फोटोत अमृता फडणवीस यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती ही ड्रग पेडलर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. मलिक यांच्या या ट्विटनंतर भाजप नेते चांगलेच भडकले आहेत. महिलांवर हल्ला करणाऱ्या मलिकांचा निषेध व्यक्त करताना त्यांनी राजकारणाची पातळी सोडल्याची टीका भाजप नेत्यांनी केली. याच टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated : 2 Nov 2021 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top