Home > Politics > योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात भाजप कधी गुन्हा दाखल करणार?-नबाव मलिक

योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात भाजप कधी गुन्हा दाखल करणार?-नबाव मलिक

योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात भाजप कधी गुन्हा दाखल करणार?-नबाव मलिक
X

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका आक्षेपार्ह शब्दावरुन त्यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांना खुर्ची देतानाच्या संजय राऊत यांच्या फोटोवरुन भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राऊतांनी एका आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. मात्र, त्या शब्दाचा अर्थ मूर्ख असा होत असल्याचा दावा राऊत करत आहेत. मात्र, या शब्दप्रयोगावरुनच त्यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राऊतांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक उतरलेत. त्यांनी याच शब्दाच्या वापरावरुन योगी आदित्यनाथ यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का? असा सवाल केला आहे.

योगी आदित्यनाथ यांनीही त्या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर भाजप कधी गुन्हा दाखल करणार असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे. माझं आवाहन आहे की , ज्या पत्रकाराला त्यांनी शब्द वापरला त्याने याविरोधात तक्रार दाखल करावी, असं नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशाताील वाराणसीच्या काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात आलं. त्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी मोदींवर देखील टीका केली आहे. मोदी हे पंतप्रधान आहेत. वाराणसी हे त्यांचं निवडणुकीचं क्षेत्र आहे. प्रश्न असा आहे की साडे सात वर्षे झाली आहेत. त्यावेळी बोलले होते की गंगाने बुलाया है. मात्र , अजूनपर्यंत गंगा नदी स्वच्छ झालेली नाही. अशा शब्दात मलिक यांनी मोदींवर टीका केली.

Updated : 13 Dec 2021 12:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top