Home > Politics > स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार?
X

नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला आहे. पण निवडणुक निकालाआधीच उत्तर प्रदेशात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याच आरोप अखिलेश यादव यांनी केला होता. तसेच केंद्रात सत्तेत असलेले भाजपचे सरकार EVM मशीनचा गैरवापर करत असल्याचा आरोपही विरोधकांकडून वारंवार केला जातो. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा EVM ऐवजी बॅलट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक महत्त्वाची मागणी केली आहे, "अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ह्या ballot paper वर घेतल्या तो राज्याचा निर्णय असतो महाराष्ट्रानी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका #BallotPaper वर घ्यावी"

अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाना पटोले यांना टॅग केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आता महाविकास आघाडी सरकार काय भूमिका घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या संदर्भात मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत आपण प्रस्ताव मांडणार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. "कर्नाटकमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात आल्या असल्याचे समजत आहे. निवडणुका कशा घ्याव्यात, हा निर्णय राज्य सरकारचा असतो. एकीकडे ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण होत असताना प्रयोग म्हणून का होईना, महाराष्ट्रातील निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात, असा माझा आग्रह आहे. माझी ही भूमिका मी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे. राज्याच्या निवडणुका पाहता तो अधिकार राज्याचा असल्याने यावेळेस मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

याआधीही विरोधकांनी वारंवार भाजपच्या विजयावर आक्षेप घेत EVMचा दुरूपयोग होत असल्याचे आरोप केले आहेत. आता ५ राज्यांच्या निवडणकांमध्ये भाजप आणि आप चा विजय झाल्यानंतर पुन्हा या मागणीने जोर धरला आहे.

Updated : 14 March 2022 8:52 AM IST
Next Story
Share it
Top