Home > Politics > केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करून कारवाईस भाग पाडणे हे भाजपचे जुने तंत्र- मुंडे

केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करून कारवाईस भाग पाडणे हे भाजपचे जुने तंत्र- मुंडे

केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करून कारवाईस भाग पाडणे हे भाजपचे जुने तंत्र- मुंडे
X

अहमदनगर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र आहे असं म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. मंत्री धनंजय मुंडे हे आज आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

भाजपचे नेते केंद्रातील तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करून राज्यातील मंत्र्यांच्या चौकशी लावत आहेत हे सबंध महाराष्ट्र बघतो आहे. मात्र सत्य काय हे लवकरच सर्वांच्या समोर येईल, सीबीआय प्रकरणात देशमुख यांना क्लिन चिट दिल्याचं सर्वांनी पाहिलं त्यामुळे कशापद्धतीने एखाद्या चांगल्या व्यक्तीला गुंतवायचं हे भाजपचे जुने तंत्र आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर पुढचा

नंबर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले होते, याबाबत विचारले असता किरीट सोमय्या यांना कोण किती गांभीर्याने घेत हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे असं त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर नुकत्याच 300 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याबद्दल बोलताना या बदल्या नियमात राहून करण्यात आलेल्या आहेत, 25-25 वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणारच होत्याअसं त्यांनी म्हटले आहे.

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्याबाबत आणि काल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , महसुलमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटी संदर्भात विचारले असता याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेतेच बोलतील, कोणत्या नावांना नेमकी आक्षेप आहे हे मला सांगता येणार नाही मात्र, अशा पद्धतीने नियुक्त्या रखडवणं योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी जास्त बोलणं टाळलं.

दरम्यान नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीबाबत बोलताना ही आमची नियमित बैठक होती असं ते म्हणाले. पक्ष अध्यक्ष शरद पवार नियमित बैठक घेत असतात त्यापैकीच ही एक बैठक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान आजच्या दौऱ्याबाबत विचारले असता नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून मदत देण्याचा निर्णय झाला आहे. त्या दृष्टीने आजचा दौरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Updated : 2 Sep 2021 6:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top