Home > Politics > "बॉल टप्प्यात आला की मी सिक्सर लावणारच"; मंत्री दत्तात्रय भरणेंची राजकीय फटकेबाजी

"बॉल टप्प्यात आला की मी सिक्सर लावणारच"; मंत्री दत्तात्रय भरणेंची राजकीय फटकेबाजी

बॉल टप्प्यात आला की मी सिक्सर लावणारच; मंत्री दत्तात्रय भरणेंची राजकीय फटकेबाजी
X

इंदापूर : काही दिवसांपूर्वी कुस्तीच्या मैदानातून आव्हान देणाऱ्या मंत्री दत्तात्रय भरणेंनी आता क्रिकेटच्या मैदानातून राजकीय फटकेबाजी केली आहे. "बॉल टप्प्यात आला की मी सिक्सर लावणारच", असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.इंदापूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, "इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे, माझ्या रक्तातच काम आहे, मी खोटं-नाटं, लबाडीचा धंदा करीत नाही. बॉल टप्प्यात आला की मी, सिक्स लावणार" असं मंत्री भरणे यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री भरणे यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निवड चाचणीचे उद्घाटन करताना "मी छोटा पैलवान आहे. मात्र मला इतका सोपा समजू नका. डावाला प्रतिडाव टाकायची माझ्यात ताकद आहे." असे रोखठोक वक्तव्य केले होते. आता त्यांच्या क्रिकेटच्या मैदानातून फटकेबाजीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Updated : 31 Oct 2021 4:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top