Home > Politics > 'चित्रा वाघ आधी नीतिमत्ता तुमच्या लाचखोर नवऱ्याला शिकवा'- मेहबूब शेख

'चित्रा वाघ आधी नीतिमत्ता तुमच्या लाचखोर नवऱ्याला शिकवा'- मेहबूब शेख

चित्रा वाघ आधी नीतिमत्ता तुमच्या लाचखोर नवऱ्याला शिकवा- मेहबूब शेख
X

वनकुटे : 'चित्रा वाघ आधी नीतिमत्ता तुमच्या लाचखोर नवऱ्याला शिकवा मग मेहबूब शेख आणि आमदार निलेश लंके यांना शिकवा' असं म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर घणाघात केला ते पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे बोलत होते.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या वनकुटे गावातील विकास कामांचा शुभारंभ राज्याचे नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागांचे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मेहबूब शेख यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

यावेळी बोलताना , 'पूर्वी आपण चित्रपटात बघितले असेल की, एखाद्याला सुपारी दिली जायची मात्र आता वेगळ्या पद्धतीने सुपारी दिली जाते आणि ती म्हणजे चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्याची' असं शेख म्हणाले. चित्रा वाघ रात्र दिवस माझ्याही नावाचा जप करतात, आमदार निलेश लंके आणि तहसीलदार ज्योती देवरे यांच्याबाबत ज्या चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण पुढे आणण्यात आलं तसाच पध्दतीने माझ्यावर खोटे आरोप त्यांनी केले होते, त्यावेळी मी माझी नार्को टेस्ट करा सत्य समोर येईल असं आव्हान त्यांना दिलं होतं.आम्हाला नीतिमत्ता शिकवण्याआधी आपल्या लाचखोर पतीला नीतिमत्ता शिकवा अशी घणाघाती टीका शेख यांनी केली.

यावेळी वनकुटे गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच आणि आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक ऍड. राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी रस्त्यांची निर्मिती, पाणी पुरवठा, लोकांचे आरोग्य या महत्वाच्या विषयांना प्राधान्य देत आमदार निलेश लंके करत असलेल्या समाजकार्य कार्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी कौतुक केले. सोबतच पारनेर तालुक्यात ३३/११ केव्हीचे सबस्टेशन पुनेवाडी येथे मंजूर करण्यात आले आहे. तसेच ३३/११ केव्ही आळकुटी येथे अतिरिक्त ५ एमव्हीएचे सबस्टेशन निलेश लंके यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर करण्यात आल्याचे सांगत तनपुरे यांनी लवकरच या सबस्टेशनची निर्मिती करून लोकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे म्हटले.



Updated : 6 Sep 2021 8:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top