Home > Politics > पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट
X

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्हॅटिकन सिटी येथे रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पोप हे रोमन कॅथलिक या जगातील सर्वात मोठ्या धर्मपंथाचे सर्वोच्च धर्मगुरू आहेत. पंतप्रधान मोदी हे पोप यांची भेट घेणारे भारताचे पाचवे पंतप्रधान आहेत. याआधी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, आय. के. गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी पोप यांची व्हॅटिकन येथे भेट घेतली होती.

दरम्यान पोप यांच्याशी कोरोना महामारी आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली आव्हाने यांसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. आमची ही भेट अतिशय सौहार्दपूर्ण होती. मी त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले, असे मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी आणि पोप यांच्यातील २० मिनिटांची ठरलेली बैठक सुमारे एक तास झाली. हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या समस्या, गरिबी, कोरोना महामारी या विषयांवर त्यांनी चर्चा केली. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताने योजलेल्या उपाययोजनांची, त्याचबरोबर १०० कोटी लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप यांना दिली.

Updated : 31 Oct 2021 4:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top