Home > Politics > मायावतींचे पुन्हा सोशल इंजिनीअरिंग, ब्राह्मण संमेलन भरवणार

मायावतींचे पुन्हा सोशल इंजिनीअरिंग, ब्राह्मण संमेलन भरवणार

मायावतींचे पुन्हा सोशल इंजिनीअरिंग, ब्राह्मण संमेलन भरवणार
X

उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही तयारी सुरू केली आहे. मायावती यांनी पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग उ. प्रदेशात करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राह्मण समाजाला आवाहन कऱण्यासाठी मायावती यांनी 23 जुलै रोजी अयोध्येमध्ये ब्राह्मण संमेलन आयोजित केले आहे. पुन्हा सत्ता मिळाली तर ब्राह्मण समाजाचे हित जपले जाईल असेही आश्वासन मायावती यांनी दिले आहे.

"मला विश्वास आहे की आता ब्राह्मण समाज भाजपच्या भुलथापांना बळी पडून येत्या निवडणुकांमध्ये त्यांना मतदान करणार नाही. ब्राह्मण समाजापर्यंत पोहोचण्यासाठी बसपाचे सरचिटणीस एस.सी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 23 जुलैला ब्राह्मण संमेलनापासून बसपा संपर्क अभियान सुरू करणार आहे. सत्तेत आल्यास ब्राह्मण समाजाचे हित जपले जाईल" असे मायावती यांनी म्हटले आहे.

ब्राह्मण समाजाने दलित समाजाप्रमाणे बसपाच्या सोबत राहावे, असे आवाहन मायावती यांनी केली आहे. भाजपचे मनी पॉवरचा कितीही वापर केला तरी दलित समाजाने आपली साथ कधीही सोडली नाही, असेही मायावती यांनी म्हटले आहे. 2007 प्रमाणे आताही ब्राह्मण समाजाने आपल्याला साथ द्यावी असे आवाहन मायावती यांनी केले आहे.

काय आहे मायावती यांचे सोशल इंजिनिअरिंग?

उ. प्रदेशमध्ये 2007च्या विधानसभा निवडणुकीत मायावती यांनी ब्राह्मण समाजातील 85 जणांना उमेदवारी दिली होती. मायावती यांना मिळालेल्या यशात त्यांच्या या जातीय समीकरणाचा मोठा वाटा होता, असे सांगितले जाते. मायावती यांना त्या निवडणुकीत दलित समाजाची 21 टक्के मते मिळाली होती तर ब्राह्मण समाजाची 11 टक्के मते मिळाली होती.

Updated : 19 July 2021 4:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top