Home > Politics > पश्चिम बंगाल राज्याचं नाव बदलणार? काय असेल नवीन नाव?

पश्चिम बंगाल राज्याचं नाव बदलणार? काय असेल नवीन नाव?

Mamata banerjee Meets to pm modi meeting discus west Bengal proposal to change name to bangla passed

पश्चिम बंगाल राज्याचं नाव बदलणार? काय असेल नवीन नाव?
X

संसदे च्या अधिवेशनात पेगॅसस हेरगिरीचं प्रकरण गाजत असताना पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पश्चिम बंगालच्या नामकरणा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे.

पश्चिम बंगाल च्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांची दिल्ली येथे मोदी यांच्याशी झालेली ही पहिलीच भेट आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उभय नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळं या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

काय झालं भेटीत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीत ममता यांनी विविध मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्या आहेत. या भेटीनंतर ममता यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या भेटीत पश्चिम बंगाल राज्याचं नाव बदलण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याचं ममता यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

काय असेल पश्चिम बंगाल चे नवीन नाव?

2018 मध्ये पश्चिम बंगालच्या विधीमंडळात राज्याचं नाव बदलून तीन विविध भाषांमध्ये वेगवेगळं नाव म्हणजेच बंगालीमध्ये बांग्ला, इंग्रजीमध्ये बेंगाल आणि हिंदीमध्ये बंगाल ठेवण्याचा प्रस्ताव पास करण्यात आला होता. हे नाव बदलण्याचा ठराव केवळ राज्याचं नाव देशातील सर्व राज्यांच्या यादीमध्ये वर आणण्यासाठी केला गेला आहे. असं बोललं जातं.

सद्यस्थितीत राज्याचं नाव पश्चिम बंगाल हे असून हे नाव इतर राज्यांच्या यादीमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. परंतु हे नाव बदलण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला केंद्रीय गृह मंत्रालयाची अंतिम मंजुरी लागणार आहे. याच पार्श्वभुमीवर हा ममता बॅनर्जी यांनी याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत हा मुद्दा छेडला.

2018 पुर्वी दोन वेळा केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकारचा नामकरणाचा प्रस्ताव नामंजुर केला होता. 2011 मध्ये राज्याचं नाव बदलून पश्चिम बंगो असे ठेवण्याचा प्रस्ताव होता, परंतु तो प्रस्तावही केंद्राने फेटाळला होता.

या पार्श्वभुमीवर आता विद्यमान केंद्रीय गृह खातं तरी या नामकरणाला मंजुरी देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated : 27 July 2021 3:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top