Home > Politics > २०२४ मध्ये देश भाजपमुक्त होणार, ममता बॅनर्जींचा मुंबईत एल्गार

२०२४ मध्ये देश भाजपमुक्त होणार, ममता बॅनर्जींचा मुंबईत एल्गार

२०२४ मध्ये देश भाजपमुक्त होणार, ममता बॅनर्जींचा मुंबईत एल्गार
X

मोदी सरकारने देश विकायला काढला आहे, पण देशाची सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे, असे मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. तसेच २०२४ मध्ये भारत भाजपमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असाही निर्धार ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत सिव्हील सोसायटीमार्फत आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करणार का, असा प्रश्न दैनिक सकाळचे संपादक श्रीराम पवार यांनी विचारला, त्यावर आपण छोटे कार्यकर्ते आहोत, पण प्रादेशिक पक्षांच्या एकीशिवाय भाजपचा पराभव शक्य नाही, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी मोदीविरोधात राष्ट्रीय आघाडी निर्माण करणार असल्याचे स्पष्ट केले. या वार्तालापाच्या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक होते, तसेच बॉलिवूडमधील महेश भट, जावेद अख्तर, स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा देखील उपस्थित होते. त्याचबरोबर ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी, मेधा पाटकर यांनी देखील विविध मुद्द्यांवर ममता बॅनर्जी यांचे विचार जाणून घेतले.

काँग्रेसला सोबत घेण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी देश पातळीवर विरोधकांची एकजूट होत असताना विविध मुद्द्यांवर तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आपण काँग्रेसकडे वारंवार व्यक्त करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

Updated : 1 Dec 2021 10:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top