Home > Politics > महाविकास आघाडी सत्तेसाठी नाही तर भाजपला रोखण्यासाठी- यशोमती ठाकुर

महाविकास आघाडी सत्तेसाठी नाही तर भाजपला रोखण्यासाठी- यशोमती ठाकुर

महाविकास आघाडी सत्तेसाठी नाही तर भाजपला रोखण्यासाठी- यशोमती ठाकुर
X

मी पुन्हा येईन वरून देवेंद्र फडणवीस यांना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांचा टोला. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) बनल्यानंतर भाजपने (BJP) महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करायला सुरूवात केली. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप करत होते. मात्र महाविकास आघाडी सत्तेसाठी नाही तर भाजपला रोखण्यासाठी बनवली असल्याचे यशोमती ठाकुर यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी जोर लावला. तारखावर तारखा दिल्या. तसेच महाविकास आघाडी ही अनैसर्गिक असल्याची टीका केली. मात्र महाविकास आघाडी ही सत्तेसाठी नाही तर भाजपला रोखण्यासाठी करण्यात आली आहे, असे मत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर (Woman And child walfare Minister Yashomati Thakur) यांनी व्यक्त केले.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, महाविकास आघाडी ही सत्तेसाठी नाही तर भाजपला रोखण्यासाठी बनली आहे. हे काम आमच्यापैकी कोणीच अर्धवट सोडणार नाही. सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेल्या आमदारांची चलबिचल रोखण्यासाठी रोज नवनवीन खेळ शोधून काढले जात आहेत. पण आम्हीही या खेळातील जुने खेळाडू आहोत. त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणणारे कायम सत्तेच्या बाहेरच राहतील, असा टोला यशोमती ठाकुर यांनी लगावला.

Updated : 10 April 2022 8:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top