Home > Politics > उद्धव ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाव

उद्धव ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाव

उद्धव ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाव
X



निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाने आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तीन निवडणूक चिन्ह आणि तीन पक्षाची नाव सादर केली होती.

उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला

१) त्रिशुल

२) उगवता सुर्य

३) मशाल ही चिन्ह सादर केलं होतं

तर पक्षाची नाव म्हणून

शिवसेना बाळासाहेब ठाकरे

शिवसेना प्रबोधनकार ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

ही नाव ठाकरे गटाने सादर केली होती.

या पैकी ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगाने दिलं आहे…

तर शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला

१) त्रिशुल

२)उगवता सुर्य

3. आणि गदा

हे चिन्ह सादर करण्यात आले होते.

निवडणूक आयोगाने दोनही गटाच्या मागणी नुसार ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलं तर ठाकरे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे. तर शिंदे गटाला आता नवीन चिन्ह सादर करावा लागणार आहे.

शिंदे गटाला नवीन चिन्ह सादर करावं लागणार…

निवडणूक आयोगाने दोनही गटाची धार्मिक चिन्ह रद्द केली होती

त्यामुळं शिंदे गटाचं गदा हे चिन्ह रद्द केलं आहे. तर दुसरीकडे दोनही गटाने त्रिशुल आणि उगवता सुर्य हे चिन्ह सादर केले होते.

दोनही गटाने दावा केलेले हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून आता रद्द करण्यात आले आहे. त्यामुळं शिंदे गटाने सादर केलेले त्रिशुल उगवता सुर्य, गदा हे तीनही चिन्ह रद्द करण्यात आले आहे.

त्यामुळं शिंदे गटाला तीनही नवीन चिन्ह सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. उद्या सकाळी १० वाजेपर्यंत शिंदे गटाला तीन नवीन चिन्ह सादर करावे लागणार आहेत.

Updated : 10 Oct 2022 3:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top