Home > Politics > देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कधी होणार? काँग्रेस नेत्याचा खोचक टोला

देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कधी होणार? काँग्रेस नेत्याचा खोचक टोला

एकनाथ शिंदे गटाने केलेली बंडखोरी आणि त्यामुळे राज्यात अल्पमतात आलेले ठाकरे सरकार परिणामी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा यामुळे आता भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची सत्तास्थापन करण्याची तयारी दिसत आहे .

देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कधी होणार? काँग्रेस नेत्याचा खोचक टोला
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राज्यपालांकडे राजीनामा दिला .आठवडाभराच्या सत्ता नाट्यानंतर कालपासून भाजप काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष होत.एकनाथ शिंदे गटाने केलेली बंडखोरी आणि त्यामुळे राज्यात अल्पमतात आलेले ठाकरे सरकार परिणामी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा यामुळे आता भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची सत्तास्थापन करण्याची तयारी दिसत आहे .

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर समाजमाध्यमांतून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रवक्ता अतुल लोंढे यांनी ट्विट केलं आहे . या ट्विटमधून अतुल लोंढे यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे ."देवेंद्र जी 2 तारखेला शपथ घेणार, 3 तारखेला मशिदींवरील भोंगे काढणार,4 तारखेला ST महामंडळ विलीन करणार, 5 तारखेला मेगा भरती करणार,6 ला पेट्रोल आणि डिझेल चे भाव 30 आणि सिलेंडर 600 रुपयांनी कमी होणार, 8 ला कर्जमाफी होणार, 9 ला ओबीसी आरक्षण देणार, 10 ला मराठा आरक्षण जाहीर होणार",असा उपहासात्मक टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रवक्ता अतुल लोंढे यांनी ट्वीटरद्वारे केली आहे .

राज्यातील अनेक प्रश्न जे रखडले होते ते देवेंद्र फडणवीसांकडून सोडवले जातील कि नाही याबद्दलची शंकाच या ट्विटद्वारे अतुल लोंढे यांनी व्यक्त केली आहे .

Updated : 30 Jun 2022 8:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top