Home > Politics > संजय राऊत यांनी पुन्हा अजित पवार यांना डिवचले

संजय राऊत यांनी पुन्हा अजित पवार यांना डिवचले

Sharad pawar : शरद पवार यांनी दिलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा परत घेण्याचा निर्णय घेतला. त्यावरून संजय राऊत यांनी अजित पवार यांना डिवचल्याचं पहायला मिळालं.

संजय राऊत यांनी पुन्हा अजित पवार यांना डिवचले
X

गेल्या काही दिवसांपुर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार भाजपसोबत जाण्याविषयी भाष्य केले होते. त्यानंतर अजित पवार (Ajit pawar) आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगितुरा रंगला होता. अजित पवार यांनी कुणी आमची वकिली करायची गरज नसल्याचा टोला लगावला होता. तर संजय राऊत यांनी मी महाविकास आघाडीचा सहयोगी पक्ष आहे. त्यामुळे मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असं म्हटलं होतं.

त्यानंतर शरद पवार यांनी राजीनामा (Sharad pawar Resign) दिल्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र अजित पवार यांनी शरद पवार यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर राजीनामा मागे घेण्यास सांगणाऱ्या कार्यकर्त्यांवर अजित पवार भडकले होते. त्यामुळे कलगितुरा रंगलेला असतानाच सामनातून पुन्हा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) संघर्ष वाढण्याची चिन्हं असतानाच संजय राऊत यांनी पुन्हा एकदा

त्यानंतर आता शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांना डिवचले आहे.

जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) बाबतीत प्रकार घडला , त्याला कोणीही शक्ति प्रदर्शन म्हणणं उचित वाटणार नाही. तो शरद पवार यांचा एक भावनिक निर्णय होता आणि लोकांच्या आग्रहाखातर तो त्यांनी मागे घेतला. राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षांकडे शरद पवारांसारखं नेतृत्व पाहिजे, असं आम्हाला वाटतं. तसेच शरद पवार हे अजित पवार यांचेसुध्दा नेते आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार यांना डिवचले.

अजित पवार नाराज असल्याची चर्चा

शरद पवार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर अजित पवार यांनी राजीनाम्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. पण त्यानंतर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची गळ घातल्यानंतर अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकल्याचे पहायला मिळाले. यानंतर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज हजर होते. मात्र अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजित पवार यांनी मी शरद पवार यांच्या निर्णयासोबत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र अजित पवार यांच्या अनुपस्थितीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Updated : 6 May 2023 6:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top