Home > Politics > महाविकास आघाडीचे काय होणार?

महाविकास आघाडीचे काय होणार?

भाजपला पर्यायी सरकार द्यायचे म्हणून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. पण आता सरकार कोसळल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र राहणार का, महाविकास आघाडीचे काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीचे काय होणार?
X

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीबद्दल पहिल्यांदाच वक्तव्य केलेले आहे. अमित शाह यांच्याशी ठरल्याप्रमाणे भाजपने अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला मानला असता, तर महाविकास आघाडी तयार झालीच नसती, असे वक्तव्य केले आहे. देशाच्या राजकारणात करण्यात आलेला महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग संपुष्टात आला आहे. पण हा प्रयोग तब्बल ३१ महिने यशस्वीपणे चालला होता. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकाही महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र लढल्या. पण आता सत्ता गेल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

सरकार कोसळल्यानंतर शरद पवार यांनी आगामी काळातील निवडणुका एकत्रित पणे लढायच्या की नाही याचा निर्णय झालेला नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे काय होणार अशी चर्चा आहे. विधिमंडळात एकनाथ शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा कायदेशीर संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे.

सांगितले आहे. पण विरोधी पक्षनेता काँग्रेसचा झाला पाहिजे असे म्हटले आहे. शिवसेनेतील बंड पाहता ५५ पैकी ३९ आमदार फुटीर गटात आहेत, राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत, तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. पण तरीही काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ते मान्य असेल का, असाही प्रश्न आहे.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली, म्हणून शिवसेनेतील अनेकांची नाराजी होती. त्याच नाराजीतून पक्षात उभी फूट पडली आहे. आघाडी केली तर प्रत्येक वेळी जागावाटपाचा प्रश्न येणार आहे, त्यामुळे इच्छुकांचे तिकीट कापले गेले तर पक्षाला निवडणुकीत त्यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो, शिवसैनिकांची राष्ट्रवादीवरील नाराजी पाहता शिवसेना तळागळापर्यंत पुन्हा भक्कम करायची असेल तर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीबाबत सखोल विचार करुन निर्णय घ्यावा लागेल, असे दिसते.

Updated : 1 July 2022 8:13 PM IST
Next Story
Share it
Top