Home > Politics > संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली - शंभूराज देसाई

संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली - शंभूराज देसाई

संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली - शंभूराज देसाई
X

खासदार संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली, त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही तर शरद पवार साहेब जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही, असे म्हणत या दोन्ही दिग्गज नेत्यांवर माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे. शिवसेनेतील बंडामध्ये शंभूराज देसाई यांनी शिंदे गटांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते सुद्धा सुरत-गुवाहाटीमध्ये होते. त्यानंतर १० ते १५ दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडी नंतर आमदार शंभूराज देसाई हे साताऱ्यात परतले आहेत.

शिवसेनेतून शिंदे गटामध्ये सामील का झालो याबद्दलची कारण त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली. खासदार संजय राऊत यांनी पक्षामध्ये वेळोवेळी केलेली ढवळाढवळ आणि आमदारांना दिलेली दुजाभावाची वागणूक यामुळे 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत, असा दावा त्यांनी केली.

आम्ही बंड करण्यासाठी पैसे घेतल्याचा पुरावा द्यावा, तसे झाले तर राजकारण सोडू घरी बसेन, असेही आव्हान त्यांनी संजय राऊत यांना दिले आहे. "आम्ही संजय राऊतांच्या कोणत्याही वक्तव्याला जास्त किंमत देणार नाही" असे देखील आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले.

राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागतील असे भाकीत करणाऱ्या शरद पवार यांचे भाकीत खोटे ठरेल, असा दावा करत शरद पवार जे बोलतात ते कधीच पूर्ण होत नाही हे अनेकदा अनुभवाला आले आहे, असे शंभूराज देसाई यांनी या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे.

Updated : 6 July 2022 11:26 AM GMT
Next Story
Share it
Top