Home > Politics > पंकजा मुंडे यांच्या फडणवीस यांना शुभेच्छा की टोमणा?

पंकजा मुंडे यांच्या फडणवीस यांना शुभेच्छा की टोमणा?

पंकजा मुंडे यांच्या फडणवीस यांना शुभेच्छा की टोमणा?
X

राज्यातील सत्तानाट्यात उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांना चीतपट करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी सोहळ्याच्या काही मिनिटं आधी भाजपमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. फडणवीस यांना पक्षाध्यक्ष आणि अमित शाह यांच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

यामध्ये पंकजा मुंडे यांच्या शुभेच्छांमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. पंकजा यांनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. "आज दिवस भरामधील घडामोडी खूप गतीने झाल्या श्री @mieknathshinde जी यांनी मुख्यमंत्री पदाची तर श्री

@Dev_Fadnavis जी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या दोघांना शुभेच्छा. देवेंद्रजी यांनी CM म्हणुन एक बेंचमार्क तयार केला आहे तो मुख्यमंत्री यांनी आणखी वर नेण्यासाठीAll the best."


असे पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांना शुभेच्छांसोबत टोमणाही लगावल्याची चर्चा सुरू आहे. दोनवेळा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते, त्यामुऴेच त्यांनी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, अशी घोषणा केली होती, अशी चर्चा आहे. पण अमित शाह यांनी थेट आदेश दिल्याने फडणवीस यांचा नाईलाज झाल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर पंकजा यांचे ट्विट चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव, त्यानंतर विधान परिषदेचे तिकीट कापणे, यामागे देवेंद्र फडणवीस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पंकजा आणि फडणवीस यांच्यातील शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या ट्विटमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Updated : 30 Jun 2022 3:17 PM GMT
Next Story
Share it
Top