Home > Politics > #MaharashtraPolitcalCrisis : शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष आता मोठ्या घटनापीठाकडे

#MaharashtraPolitcalCrisis : शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष आता मोठ्या घटनापीठाकडे

#MaharashtraPolitcalCrisis : शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष आता मोठ्या घटनापीठाकडे
X

शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. तसेच याबाबतची सुनावणी २५ तारखेला ठेवण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत. यामध्ये विधानसभा उपाध्य़क्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असताना त्यांना कारवाईचे अधिकार आहेत का, पक्षातील अंतर्गत वादात निवडणूक आय़ोगाची भूमिका आणि त्यांचे अधिकार तसेच पक्षांतर बंदी कायद्यातील काही मुद्दे वगळले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, या सगळ्या मुद्द्यांवर हे घटनापीठ निर्णय घेईल असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

याप्रकरणावरील सुनावणी तीनवेळा पुढे ढकलली गेली होती. पण अखेर २३ ऑगस्ट रोजी ही सुनावणी झाली, यामध्ये कोर्टाने प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचे आदेश दिले. उद्धव ठाकरे गटातर्फे ज्या नबाम राबिया प्रकरणाचा उल्लेख केला जात आहे. त्याबाबत त्या प्रकरणाच्या निर्णयात ज्या त्रुटी राहिल्या आहेत, त्या त्रुटी दूर करण्याची गरज असल्याचे मत कोर्टाने यावेळी व्यक्त केले. तसेच अविश्वास प्रस्तावाची नोटीस असताना विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार काय तेसुद्धा ठरवण्याची गरज यावेळी कोर्टाने व्यक्त केली.

Updated : 23 Aug 2022 10:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top