Home > Politics > ठाकरे नाव न लावता रस्त्यावर येऊन दाखवा - निलेश राणे

ठाकरे नाव न लावता रस्त्यावर येऊन दाखवा - निलेश राणे

ठाकरे नाव न लावता रस्त्यावर येऊन दाखवा - निलेश राणे
X

"उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नशिबाने झालेले नेते आहेत. उद्धव ठाकरे यांनी अशी कुठली मोठे आंदोलनं गाजवली आहेत,. महाराष्ट्राचे कोणते प्रश्न सोडवले" असा सवाल नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरण्याचे उद्धव ठाकरे सांगत आहेत, पण त्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी ठाकरे नाव न वापरता रस्त्यावर या आणि मग बघा तुमची किंमत काय आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

"खुर्ची आहे म्हणून तुम्हाला एवढी घमेंड आहे, पण उद्या ती खुर्ची गेली की तुमची अवस्था वाईट होणार आहे, ही सगळी गर्दी मातोश्रीच्या आजूबाजूला दिसते ना ती फक्त त्या खुर्चीमुळे गर्दी आहे. ती खुर्ची गेली की ५० ते ४० टक्के गर्दी दिसणार नाही", असा इशारा त्यांनी दिला आहे.

Updated : 27 Jun 2022 3:51 AM GMT
Next Story
Share it
Top