Home > Politics > किरीट सोमय्या- मला तोत्रा म्हणणाऱ्यांना हिशेब द्यावा लागणार

किरीट सोमय्या- मला तोत्रा म्हणणाऱ्यांना हिशेब द्यावा लागणार

किरीट सोमय्या-  मला तोत्रा म्हणणाऱ्यांना हिशेब द्यावा लागणार
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात युती करुन आमच्यावर आरोप करणाऱ्या त्या तोत्र्याशेजारी बसायचे का, असा सवाल बंडखोर आमदारांना विचारला होता. आता यावरुन किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. आम्ही या भ्रष्ट सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. "मला तोत्रा म्हणा, बोबड्या, भडवा म्हणा पण त्यांना हिशेब द्यावा लागणार" असा इशारा त्यांनी दिला आहे.

"19 बंगल्यांचा हिशोब घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, नंदकिशोर चतुर्वेदीकडून आदित्य ठाकरेंनी किती पैसे घेतले आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्रला जागा विकली, आणि परत विकत घेतली" याचे उत्तर द्यावे लागणार आहे, असेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले. तसेच मनसुख हिरेन यांचीही हत्या सरकारनेच केली असा आरोप त्यांनी केला आहे. माफिया सरकार आणि त्यांचे प्रवक्ते आम्हाला धमक्या देत आहेत, असा आरोप त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता केला आहे.

Updated : 26 Jun 2022 9:24 AM GMT
Next Story
Share it
Top