Home > Politics > Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालय मतदारांची बाजू ऐकेल, असीम सरोदे यांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालय मतदारांची बाजू ऐकेल, असीम सरोदे यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये Adv. असीम सरोदे यांनी मतदारांची बाजू मांडण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून असीम सरोदे मतदारांची बाजू मांडणार आहेत.

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालय मतदारांची बाजू ऐकेल, असीम सरोदे यांनी व्यक्त केला विश्वास
X

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. यामध्ये मतदारांची बाजू मांडण्यासाठी Adv. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी हस्तक्षेप याचिका (intervention petition) दाखल केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून मतदारांची बाजू मांडली जाणार आहे. मात्र सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना मतदारांची बाजू नेमकी कधी मांडली जाणार? याविषयी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना असीम सरोदे यांनी माहिती दिली. असीम सरोदे म्हणाले, मतदारांना काहीच महत्व न देण्याची पध्दती आहे. कारण मतदाने केल्यानंतर तुमचा काहीही संबंध नसल्याप्रमाणे वागवले जाते. दुसरीकडे राजकीय पक्ष आमदारांची खरेदी-विक्री करतील, घोडेबाजार करतील. मात्र हे विकसीत लोकशाहीत (Democracy) चालणार नाही, हे ठणकावून सांगण्यासाठी आम्ही जनतेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. यामध्ये सध्या दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तीवाद सुरु आहे. मात्र जनतेच्या वतीने युक्तीवाद करण्यासाठी घटनापीठ दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आम्हाला जनतेची बाजू मांडण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ देईल, असा विश्वास असीम सरोदे यांनी व्यक्त केला.

Updated : 28 Feb 2023 5:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top